Ad will apear here
Next
सोलापुरात घंटागाडी करणार मतदारांमध्ये जनजागृती


सोलापूर : जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत सुमारे साडेचारशे घंटागाडीच्या सहाय्याने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदार जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ‘स्वीप’ उपक्रम राबवला जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या कार्यक्रमासाठी जिल्हा समितीचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची नियुक्ती केली आहे. डॉ. भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत १५ मार्च २०१९ रोजी झालेल्या बैठकीत स्वीप कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा मतदारसंघांत यापूर्वी सुमारे ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. मतदानाची ही टक्केवारी वाढविण्यासाठी आणि मतदान जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, शपथ नाट्य, पत्रलेखन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
 
सोलापूर महानगरपालिकेबरोबरच जिल्ह्यातील विविध नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या घंटागाडीच्या सहाय्याने मतदार जनजागृती केली जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीस ‘स्वीप’ समितीसह अध्यक्ष अंकुश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, देवदत्त गिरी, महापालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, शिक्षणाधिकारी संजय राठोड, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZQUBY
Similar Posts
‘आई... बाबा... मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’ सोलापूर : ‘आई... बाबा... तुम्ही मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा...!’ असा संदेश सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या पालकांना पत्राद्वारे देणार आहेत. सोलापूर व माढा या लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे.
मानवी साखळी आणि सायकल रॅलीद्वारे सोलापुरात मतदार जागृती सोलापूर : भव्य सायकल रॅली आणि सुमारे सात हजार नागरिकांनी केलेली साखळी यांच्या माध्यमातून सोलापुरात मतदार जागृती करण्यात आली.
‘स्वत:च्या घराचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही’ सोलापूर : ‘स्वत:चे घर उभारण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. मातीच्या घराचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पक्क्या घरात झाले. सुरक्षितपणे जगता येऊ लागले,’ अशा शब्दांत अनेक लाभार्थींनी दोन जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केल्या.
‘टॅंकरबाबतचा प्रस्ताव ४८ तासांत पाठवावा’ सोलापूर : ‘या वर्षी सोलापूर जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच पाऊस झाल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून टॅंकरसाठी मागणी येईल. अशी मागणी आल्यास टॅंकरबाबतचा प्रस्ताव ४८ तासांत पाठवावा,’ अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिल्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language